आईला दवाखान्यात नेण्यासाठी गोवंडी रेल्वे स्थानकाकडे पायी जात असताना पाठीमागून आलेल्या रिक्षा चालकाशी हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून तरूणीला रिक्षा चालकाने भररस्त्यात मारहाण केली. यावेळी आरोपीसोबत असलेल्या महिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून रिक्षा चालकाला अटक केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : सागरीसेतूवरून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला
गोवंडी परिसरात ३३ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह राहते. वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. सोमवारी आईची तब्येत बिघडल्याने तिने भावाला दूरध्वनी करून आईला दवाखान्यात नेण्याबाबत सांगितले. भाऊही सुट्टी घेऊन घरी आला. तोपर्यंत तरूणी आईला घेवून बाहेर पडली. त्याने वाटेतच आईला जास्त त्रास होत असल्याने दुचाकीवर सोबत घेतले. तरुणीला रेल्वे स्थानकावरून येण्यास सांगितले.
हेही वाचा >>> मुंबईः चपलेत लपवले कोट्यावधींचे सोने; परदेशी महिला अटक
बैंगनवाडी सिग्नल जी एम लिंक रोड येथून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पायी जात असताना, पाठीमागून येणारा रिक्षा चालक तिला मरने का है क्या असे बोलला. त्यावेळी हॉर्न का नाही वाजवला, असे विचारले असता आरोपीने रिक्षाचालक गुलजार फैय्याज अली, महिला नामे शिरीन आसिफ खान, एक अनोळखी महिला यांनी तिला बैंगणवाडी जंक्शन ते ट्रान्झिस्ट कॅम्पपर्यंत ओढत नेले. तेथे तिला बेदम मारहाण केली. तिने आरडाओरडा केला असता आरोपीने चाकूने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.