scorecardresearch

Premium

Goregaon Building Fire : मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून मदत जाहीर, पंतप्रधान मोदी म्हणाले…

Mumbai Goregaon Building Fire : मुंबईतल्या गोरेगावमधल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आज सकाळी भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

PM Modi Mumbai Fire
राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही गोरेगावमधील आगीच्या दुर्घटनेची दखल घेतली आहे.

Mumbai Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान त्वरीत मदतीसाठी दाखल झाले आणि त्यांनी इमारतीतल्या ३० नागरिकांना सुखरूप वाचवलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी सांगितलं.

या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या आगीत जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, असंही राज्य सरकारने जाहीर केलं आहे. राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही या दुर्घटनेची दखल घेतली असून मृतांच्या कुटुबीयांना मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींनाही मदत केली जाणार असल्याचं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे.

election commission order maharashtra government to transfer ias officers who completed three years
तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे यांना आदेशाचा फटका
Student molestation case thane
विद्यार्थी विनयभंग प्रकरण : भाजपचे पदाधिकारी गोएंका शाळेत शिरताच पालकांचा विरोध
Home Minister Devendra Fadnavis marathi news, three murders nagpur marathi news, nagpur crime news
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात चोवीस तासांत तीन हत्याकांड; अखेर ‘त्या’ जखमीचाही मृत्यू
Hemant Soren
व्हॉट्सॲप चॅटमुळे हेमंत सोरेन यांच्या पोलीस कोठडीत वाढ, ईडीला नक्की काय सापडलं?

पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की मुंबईतल्या गोरेगावमधल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना. तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती मदत प्रशासन करत आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goregaon building fire rs 2 lakh assistance from pmo to families of who died in accident asc

First published on: 06-10-2023 at 17:29 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×