चलनतुटवडा दूर करण्यासाठी रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश
पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर निर्माण झालेल्या सुटय़ा पशांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने देवाचा धावा सुरू केला आहे. चलनकल्लोळाच्या समस्येवर उपाय म्हणून सरकारने सर्व मंदिरांना दानपेटीत साठलेली सुटय़ा पशांची रक्कम तातडीने बँकांमध्ये भरण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी मंदिर प्रशासनांनी तातडीने सुरू झाली असून मुंबईतील प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक, मुंबादेवी आणि महालक्ष्मी देवस्थाने मंदिरात जमणारे सुटे पसे आपापल्या बँकांच्या खात्यावर जमा करीत आहेत.
[jwplayer CdTbNsE8]
पाचशे-हजाराच्या नोटबंदीमुळे शंभर-पन्नास रुपयांच्या सुटय़ा पशांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मंदिरांच्या दानपेटीतील शंभर-पन्नास रुपयांचे सुट्टे पसे मोठय़ा संख्येने असतात. ते चलनात आल्यास थोडाफार दिलासा मिळेल या उद्देशाने सरकारने मंदिर प्रशासनांना दानपेटीतील सुटे पसे बँकांमधील खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. या घोषणेनंतर मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांपकी सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर प्रशासनांनी तातडीने हे पैसे बँकेत भरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडय़ात तिन्ही देवस्थानांनी मंदिरातील दानपेटीत पडलेल्या पैशाची मोजणी केली. मोजणीनंतर जुन्या पाचशे-हजाराच्या नोटांची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आले.
जुन्या पाचशे-हजारांच्या नोटांची वाढीव संख्या असली तरी त्यात शंभर, पन्नास, दहा, वीस रुपयांच्या सुटय़ा नोटांचे प्रमाणही अधिक होते. सरकारच्या या घोषणेआधी सिद्धिविनायक आणि मुंबादेवी मंदिर प्रशासन आठवडय़ातून एकदा, तर महालक्ष्मी मंदिर प्रशासन आठवडय़ातून दोन वेळा दानपेटीची मोजणी करत होते; पण सरकारच्या या घोषणेनंतर तिन्ही मंदिर प्रशासनाने दररोज दानपेटय़ांमधील साठलेल्या रकमेची मोजणी करत असून त्यातील नाणी-नोटांचे सुट्टे चलन रोजच्या रोज बँकांमध्ये जमा करत आहेत.
‘महालक्ष्मी मंदिर प्रशासनही याआधी आठवडय़ातून दोन वेळा दानपेटीतील रकमेची मोजणी करून त्याचा अहवाल सरकारला देत आहे. आता दररोज मोजणी करावी लागत असून त्याचाही अहवाल आम्ही प्रशासनाला देत आहोत,’ असे महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक शरद पाध्ये यांनी सांगितले.
सरकारचे सुटे पसे जमा करण्यासंबंधीचे परिपत्रक आम्हाला मिळाल्यापासून दररोज दानपेटीत जमा झालेल्या रकमेची मोजणी आम्ही करत असून शंभर ते दहा रुपयांच्या नोटा, अगदी नाणीही आम्ही आमच्या बँक खात्यात जमा करत आहोत. तसेच त्यासंबंधीचा अहवाल विधि व न्याय खात्याला पाठवत आहोत.’’
– संजीव पाटील, सिद्धिविनायक मंदिराचे कार्यकारी अधिकारी
[jwplayer 9AX3hgPE]