मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री विमानाच्या पंख्यात अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. एअर इंडियाचे मुंबई-हैदराबाद हे विमान रात्री पावणेनऊच्या सुमारास २८ क्रमाकांच्या धावपट्टीवरून उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी विमानतळावरील ग्राऊंड स्टाफपैकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकजण विमानाच्या इंजिनाच्या पंख्याजवळ तांत्रिक गोष्टींची तपासणी करत होता. मात्र, अचानकपणे पंख्यांच्या सक्शन पॉवरमुळे हा कर्मचारी आत खेचला गेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातात संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यामुळे त्याची ओळख पटवणे अद्यापपर्यंत शक्य झालेले नाही. दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.