मुंबई : भारतीय वन्यजीव संस्थेकडून (डब्लूआयआय) दापोली येथील हर्णै बंदराचे सागरी परिक्षेत्र हे अरेबियन सी हम्पबॅक व्हेलचे ‘हॉटस्पॉट’ असल्याची नोंद केली आहे. मच्छीमारांच्या मदतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी लवकरच शास्त्रज्ञांकडून व्हेलचा ध्वनिविषयक (अकूस्टिक) अभ्यास सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> आपत्कालीन साखळी खेचल्याने १९७ गाडया उशिराने 

हम्पबॅक व्हेलचा भारतीय समुद्रातील अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी देशाच्या किनारपट्टी भागात भारतीय वन्यजीव संस्थानकडून संशोधन प्रकल्प राबविण्यात आला आहे. भारतीय वन्यजीव संस्थानाचे संचालक वीरेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. जे.ए. जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत संशोधकाचे पथक संशोधन कार्य करत आहे.

हेही वाचा >>> दादर स्थानकातील फलाट क्रमांकांत बदल; आजपासून अंमलबजावणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संशोधनामध्ये पूर्वीच्या नोंदी, किनाऱ्यावर वाहून आल्याच्या नोंदी, मासेमारी नोंदी यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर मच्छीमारांच्या मुलाखती घेऊन अंतिम सर्वेक्षण केले गेले. हम्पबॅक व्हेलचे अधिवासाचे ठिकाण, निरीक्षण तसेच सागरी सस्तन प्राण्यांना असणारे धोके हे या सर्वेक्षण करण्यामागील मुख्य कारण होते. या सर्वेक्षणानुसार हम्पबॅक व्हेल सतत दिसत असेल त्या ठिकाणाची त्यांचे ‘हॉटस्पॉट’ म्हणून निश्चिती करण्यात येते. ससून बंदर, डहाणू, बोर्ली, हर्णै, तारकर्ली आणि वेलदूर या प्रमुख बंदरावर सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात ४०० मच्छीमारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.