scorecardresearch

संजय राऊत यांच्याविरोधात एक नोव्हेंबरपासून ‘या’ खटल्याला सुरूवात

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात एक नोव्हेंबरपासून ‘या’ खटल्याला सुरूवात
मेधा सोमय्या आणि संजय राऊत

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीचा आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर १ नोव्हेंबरपासून खटला चालवण्यात येणार आहे. खटल्याची नियमित सुनावणी घेण्याचेही शिवडी न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

हेही वाचा- मानहानीची तक्रार : संजय राऊत यांना हजर करण्याचे आदेश ‘ईडी’ला द्या – मेधा सोमय्यांची शिवडी न्यायालयाकडे मागणी

मेधा यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असे राऊत यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी १ नोव्हेंबरपासून राऊत यांच्या विरोधातील खटला सुरू करण्यात येईल. तसेच खटल्याची नियमित सुनावणी होईल, असे महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी स्पष्ट केले. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी अटकेत असल्याने राऊत यांना मागील सुनावणीच्या वेळी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधातील गुन्हा मान्य आहे का ? अशी विचारणा न्यायालयाने राऊत यांना केली होती. त्यावर राऊत यांनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे सांगितले होते.

हेही वाचा- वांद्रे-कुर्ला संकुलातील दसरा मेळाव्याला दीड ते दोन लाखांची गर्दी ? दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची तयारी

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या