मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत.
शिवसेनेच्या फुटीर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याचिका फेटाळून लावल्या. निवडणूक आयोगानेही शिंदे यांचा गट हाच मूळ पक्ष असल्याचा निर्वाळा देत त्यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिले. या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर तब्बल दीड वर्षानंतर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंग यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. मात्र कार्यसूचीवर याचिका ४३ व्या क्रमांकावर असल्याने खंडपीठास सुनावणीसाठी वेळ मिळणार का, याबाबत साशंकता आहे.