scorecardresearch

राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आले.

राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईः राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आले. त्यात नागपूरच्या अपर पोलीस आयुक्त नीवा जैन यांची प्रतिनियुक्तीवर अपर निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन सचिव कार्यालय (नवी दिल्ली) येथे बदली करण्यात आली. याशिवाय बिपीनकुमार सिंह यांची राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी तर विनीत अगरवाल यांची अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा यापदी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबई : तब्बल १८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा, १०० कोटी रुपये दंड वसूल

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके पदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय जय वसंतराव जाधव यांची विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, कैसर खालीद यांची विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य मोटर परिवहन, पुणे, डी.के. पाटील भुजबळ विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एस.एच महावरकर यांची पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अभिजीत शिवथरे यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राज्य महासंचालक कार्यालय, नाशिक शहरमधील उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांची पोलसी उपायुक्त(मिरा-भाईंदर), अमरावतीलमधील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल खाडे यांची अपर पोलीस अधिक्षक जालना येथे बदली करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 20:15 IST
ताज्या बातम्या