Crime Story : मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती. त्या भाऊ गर्दीत दोन पोलीस त्यांची ड्युटी संपवून घरी परतत होते. तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू आला. एक माणूस भर ट्रॅफिक जाममध्ये वाचवा वाचवा असं म्हणत होता. पोलीस पुढे गेले त्याच्या ओरडण्याकडे लक्ष दिलंं आणि एका हत्येचा उलगडा झाला. ही घटना आहे साधारण दहा वर्षांपूर्वीची. चला जाणून घेऊ काय घडलं.
१० ऑक्टोबर २०१४ ला नेमकं काय घडलं?
१० ऑक्टोबर २०१४ ला दोन पोलीस त्यांची ड्युटी संपवून घरी परतत होते. गोरेगाव या ठिकाणी दोघंही ट्र्रॅफिकमध्ये अडकले. ओबेरॉय मॉलजवळ आले असताना या दोघांना एक माणूस दिसला. तो हात उंचावून ओरडत होता की मला वाचवा. पोलिसांनी त्याला विचारलं की तू का ओरडतो आहेस? पोलीस त्याच्या जवळ गेले तेव्हा त्यांना लक्षात आलं की तो माणूस नशेत आहे. तसंच पोलिसांनी हे ऐकलं त्या नशेत असलेल्या माणसाने एका माणसावर हल्ला केला आहे. ज्याच्या बाबत तो बोलतो आहे तो बहुदा मेला आहे. या दोन्ही पोलिसांनी नशेत असलेल्या माणसाला गोरेगाव पोलीस ठाण्यात नेलं आणि तिथे ड्युटीवर असेलल्या पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यात त्याला देण्यात आलं. पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. ज्यानंतर या माणसाने मान्य केलं की त्याने संदीप धामणसकर नावाच्या एका माणसाला मारहाण केली आहे. जवळच असलेल्या एका पार्कमध्ये ही घटना घडल्याचंही त्याने सांगितलं.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं होतं?
नशेत असलेल्या माणसाकडून ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पार्कच्या दिशेने धाव घेतली. जो माणूस नशेत होता त्याचं नाव रणजीत चौहान होतं त्याने संदीप धामणसकरला मारहाण केली. या दोघांमध्ये दारु कोण आणणार यावरुन वाद झाला होता. तो विकोपाला गेल्यानंतर रणजीतने संदीपला मारहाण केली. धामणसकरवर हल्ला झाल्याचं त्याच्या पत्नीला म्हणजेच भक्तीलाही समजलं होतं. ती पार्कमध्ये आली तेव्हा तिने लोकांना इकडे तिकडे पळताना पाहिलं. लोकांनी भक्तीला सांगितलं की रणजीतने संदीपवर स्क्रू ड्रायव्हरने वार केले आहेत. भक्तीनेही रक्ताच्या थारोळ्यात संदीपला पाहिलं. त्यानंतर काही लोकांच्या मदतीने तिने संदीपला रुग्णालयात नेलं. या सगळ्या धावपळीत रणजीत तिथून पळाला. पण तो नशेत होता त्यामुळे दारुच्या नशेत ओरडू लागला. जेव्हा तो गोरेगावच्या मॉलजवळ आला तेव्हा दोन पोलिसांनी त्याचा आरडाओरडा ऐकला. इकडे रुग्णालयात संदीपचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
न्यायालयाने रणजीतला सुनावली जन्मठेप
दरम्यान हे प्रकरण जेव्हा न्यायालयात गेलं तेव्हा सत्र न्यायालयात भक्ती धामणसकर आणि दोन पोलीस यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे १७ ऑक्टोबर २०१४ रोजी रणजीतला पोलिसांनी हत्येसाठी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संदीपच्या शरीरावर २५ हून अधिक वार आणि जखमा होत्या. तो प्रचंड रक्तबंबाळ झाला होता. संदीप आणि रणजीत यांच्यात दारु आणण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि रणजीतने पुढचा मागचा विचार न करता संदीपची हत्या केली. संदीपवर अशा प्रकारे वार केल्याने तो जिवाला मुकू शकतो हे रणजीतला ठाऊक होतं तरीही तो थांबला नाही त्यामुळे आम्ही त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहोत असं न्यायालयाने शिक्षा सुनावताना म्हटलं होतं.
