मुंबई : संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार राज्यपाल भगर्तंसह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

भाजप नेते  आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या ‘स्पंदन’ या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवनगौरव व  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे आहे. तर रफी पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये रोख आणि मानचिन्ह असे  आहे.  ‘रफी ही एक संगीताला लाभलेली दैवी देणगीच होती. ते कलावंत म्हणून मोठे होते तेवढेच माणूस म्हणून मोठे होते. आपल्याला दैवाकडून जे मिळाले ते त्यालाच परत कसे करायचे याची जाण त्यांना होती. त्यामुळे ते कसे  या दैवी देणगीची परतफेड करायचे ते मी पहिले आहे’, अशा शब्दात मंगेशकर यांनी रफी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘कलावंत हा अमर असतो. कलाकार किती हृदयापर्यंत पोहोचतो यावरच त्याचे अमरत्व अवलंबून असते. रफी साहेबांना हे अमरत्व प्राप्त झाले आहेच; पण आज त्यांच्यासारख्या कलावंताचे स्मरण करताना पुन्हा पुन्हा असे महान कलावंत जन्माला यावेत अशी प्रार्थना आपण करू’, असे राज्यपाल म्हणाले. कविता कृष्णमूर्ती यांचा पुरस्कार त्यांचे पती प्रसिद्ध व्हायोलिन वादक एल. सुब्रमण्यम यांनी स्वीकारला.