आज मुंबई काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस पक्षात ते मागच्या ४८ वर्षांपासून कार्यरत होते. एक X पोस्ट लिहून त्यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधलं एक बडं नाव आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडणं हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्का मानला जातो आहे. तुम्ही अजित पवारांबरोबर जाणार का? या प्रश्नाचं तसंच काँग्रेस पक्ष का सोडला याचं उत्तर बाबा सिद्दीकींनी आता दिलं आहे.

काय म्हणाले बाबा सिद्दीकी?

१० तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. एका छोट्या सभेत मी सांगणार आहे की काय घडलं. मी आता निर्णय घेतला आहे. मला कुणी थांबवण्याचे प्रयत्न केले ते मी सांगणार नाही. मला काही गोष्टी समजल्याच नाही. मी काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यानंतरही काही गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळे मी ठरवलं की आपण लांब गेलेलं बरं. प्रत्येक समाजाला घेऊन जाण्याचं काम आजच्या घडीला अजित पवार करत आहेत. मात्र मी १० तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन. काँग्रेसमध्ये काय गोष्टी घडल्या त्याबद्दल मौन बाळगलेलं बरं. पण मला न पटणाऱ्या त्या होत्या. मला अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मी माझा निर्णय पक्षश्रेष्ठींना १५ दिवसांपूर्वीच कळवला होता.” असं बाबा सिद्दीकी म्हणाले आहेत.

कधी कधी काही गोष्टी पटत नाहीत

“कधी कधी काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. त्यामुळे जाऊदेत त्या गोष्टी झाल्या आहेत. मी त्यादिवशी तुम्हाला हे सांगितलं नाही. मी दीर्घकाळ काँग्रेसमध्ये होतो. पण मी अचानक निर्णय हा निर्णय घेतला नाही. माझा नाईलाज झाला त्यामुळे पक्ष सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. गोष्टी बरोबर घडल्या नाहीत की आपण बाजूला झालेलं बरं म्हणून मी बाजूला झालो.” असंही बाबा सिद्दीकी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- बाबा सिद्दीकी : मुंबई काँग्रेसचा निष्ठावान अल्पसंख्याक चेहरा

झिशान सिद्दीकी काय निर्णय काय ते त्यांनी ठरवायचं आहे. अजित पवार गटाबरोबर जाण्याचे माझे बॅनर लागले आहेत.मात्र लवकरच मी पत्रकार परिषद घेणार आहे. मी जिथे जाणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. माझ्या बरोबरचे लोकही तुम्ही त्या जाहीर सभेत असतील. छोट्या सभेत जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक असतील त्यांच्यासह मी दुसरीकडे जाणार आहे. तुम्हाला ते १० तारखेपर्यंत समजेल. आम्ही ज्या पक्षात जाऊ त्या पक्षाची ताकद वाढवणार आहोत. काँग्रेसबरोबर निष्ठेने केलं त्याच निष्ठेने नव्या पक्षात काम करेन. असंही बाबा सिद्दीकी म्हणाले.