मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील ८ स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी दूर दृश्य प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे.

हेही वाचा : मुंबई विमानतळावरून तीन दिवसांत आठ किलो सोने जप्त

Western Railway, Cancels Mega Block, Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, Western Railway Cancels Mega Block, to stop Passenger Discomfort, mumbai local, mumbai news, marathi news,
डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द
Steel Benches on Dombivli Railway Station with courtesy of Srikant Shinde
डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार
Security guard assaulted at Nagpur metro station
नागपूरच्या मेट्रो स्थानकावर सुरक्षा रक्षकाला मारहाण, ‘हे’ आहे कारण
thane metro
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील ठाणे मेट्रोला विलंब का होतोय? आता डिसेंबर २०२५चा मुहूर्त?

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील एकूण १,३०९ रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या स्थानकांचे आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या स्थानकांवर अत्याधुनिक, आरामदायी आणि उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. आगामी अर्थसंकल्पात राज्यासाठी १५,५५४ कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत ५६ स्थानकांचा जागतिक दर्जाप्रमाणे विकास केले जाणार आहे. या ५६ स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ स्थानकांचा समावेश आहे. या १२ स्थानकांमध्ये भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी यांचा समावेश आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर स्थानकांचे रूप पालटणार आहे.

हेही वाचा : मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ फेब्रुवारी रोजी १,५०० उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ५५४ स्थानकांच्या विकास कामांची पायाभरणी करणार आहेत. अमृत भारत स्थानक योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांना झळाळी मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधा वाढल्याने, प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकऱ्याने सांगितले.