मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईत गेल्या ९ वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या इतिहासात १९९९ साली सर्वाधिक म्हणजे ९१ व्यक्तींचा मृत्यू गोळीबारात झाला होता. मुंबई पोलिसांकडून सुमारे १० हजारांहून अधिक अग्निशस्त्राचे परवाने देण्यात आले आहेत.

गेल्या नऊ वर्षांच्या तुलनेत मुंबईत २०१६ मध्ये सर्वाधिक म्हणजे गोळीबाराच्या पाच घटना घडल्या असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये दोन व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला आहेत. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येतील प्रकरणात घोसाळकर व मॉरिस या दोघांचा मृत्यू झाला होता. मुंबईत २०१७ मध्ये दोन व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला होता. तर २०१८ व २०१९ मध्ये अनुक्रमे दोन व एका व्यक्तीला गोळीबारात मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मुंबईत गोळीबाराची एकही घटना घडली नव्हती. त्यानंतर २०२१ मध्ये दोन, २०२२ मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू गोळीबारात झाला होता. २०२३ मध्ये दोन गोळीबाराच्या घटनांमध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. मुंबईत ९० च्या दशकात टोळीयुद्ध भडकले होते. मुंबईत १९९९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९१ व्यक्तींचा मृत्यू गोळीबारात झाला होता. त्यात प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडाची हत्या व पोलिसांबरोबर गुंडांच्या झालेल्या चकमकींचा सहभाग आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

हेही वाचा : Video: गोष्ट मुंबईची – मुंबई आणि आदिवासी नेमका संबंध काय? पुरावे कोणते?

मुंबईत १० हजार पेक्षा जास्त शस्त्र परवाने

राज्यात बंदुकीचा परवान्याबाबत फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबईत सुमारे दहा हजार अग्निशस्त्र परवाने देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन हजार अग्निशस्त्र परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यांचा आढावा मुंबई पोलिसांकडून नियमित घेण्यात येतो.