मुंबई : घाटकोपर मधील लक्ष्मीनगर येथे सोमवारी रात्री २९ मृत फ्लेमिंगो आढळले. विमानाच्या धडकेने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. लक्ष्मीनगर येथे सोमवारी रात्री २९ फ्लेमिंगोचे मृतदेह आढळून आले. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघात झालेल्या परिसराची त्यांनी पाहणी केली. तसेच मृत फ्लेमिंगोंचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, पाणथळ प्रदेशाचे संरक्षण करण्याची मागणी सरकारकडे वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर लक्ष्मीनगरला हा अपघात होणे कसे शक्य आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण फ्लेमिंगो त्या दिशेने शक्यतो जात नाहीत. त्यामुळे आता टीएस चाणक्य आणि एनआरआय पाणथळ प्रदेशाची चौकशी करणे गरजेचे असल्याचे देखील पर्यावरणप्रेमी तसेच पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
हेही वाचा : lok sabha election 2024 : उन्हामुळे सकाळीच मतदानाचा उत्साह
काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील डीपीएस तलावाजवळ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.