मुंबई : वरळी येथील मुंबई महानगरपालिकेच्या ‘इंजिनिअरिंग हब’जवळ बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळाची क्षमता वाढवण्यात आली आहे. चार वर्षांत हे भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आचार्य अत्रे चौक परिसरात भूमिगत मेट्रो स्थानक, तसेच पालिकेचे अभियांत्रिकी संकुल यासह अनेक खासगी व्यावसायिक इमारती आहेत. नागरिकांची गरज लक्षात घेऊन मुंबई वाहनतळ प्राधिकरणाने ही शिफारस केली. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि वाहनतळांची संख्या यात तफावत असून शहरात जागोजागी बेशिस्त पद्धतीने चारचाकी आणि दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. या साऱ्या गोंधळाच्या स्थितीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा खोळंबा होत आहे.

वाढत्या वाहन संख्येमुळे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी येथील भुलाबाई देसाई रोड परिसरात स्वयंचलित बहुमजली वाहनतळ सुरू केले होते. मुंबईतील जागा आता कमी पडू लागल्यामुळे पालिकेने बहुमजली स्वयंचलित वाहनतळांचा पर्याय पुढे आणला आहे. याअंतर्गत मुंबादेवी आणि माटुंगा येथे भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानजिक तसेच मुंबादेवी परिसरात बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ सुरू करण्याचे ठरवले होते. रोबो अर्थात स्वयंचलिक पार्किंग उभारण्याकरीता कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. ही वाहनतळे पूर्ण झाल्यानंतर माटुंगा येथे ४७५ वाहनांसाठी, तर मुंबादेवी येथे ५४६ वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आता वरळीतही वाहनतळ उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील वाहनतळांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत वरळी येथे महापालिकेच्या इंजिनीअरिंग हबजवळ विद्याुत यांत्रिकी पद्धतीने संचालित होवू शकणारे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या बहुमजली स्वयंचलित तसेच रोबो ॲण्ड शटल या तंत्रज्ञानासह उभारण्यात येणाऱ्या वाहनतळासाठी २१६ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे. या वाहनतळाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये सुमारे ४,२०० चौरस मीटर इतकी वाढ करण्यात आली आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री

हेही वाचा… मुंबईत आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम

मुंबई अग्निशमन दलाच्या सद्यस्थितीतील मानकानुसार या वाहनतळ इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येजाणार आहे. यामध्ये प्रत्येक वाहनाच्या जागी उष्णता शोधक (हिट डिटेक्टर) आणि विमोचन शीर्ष (डाऊझर हेड) बसवण्यात येईल. तसेच प्रत्येक मजल्यावर मोठ्या आकाराच्या वाहिन्या, वीस हजार लिटर दाबाचे व्हेसल, पंप इत्यादी लावण्यात येईल. त्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा व्यवस्था, झडपा, केबलिंग पॅनल, नियंत्रित केबलिंग, धूर दिसताच तात्काळ इशारा देणारी यंत्रणा या सर्वांचा समावेश करणारी संयंत्रे या वाहनतळामध्ये उभारली जाणार आहेत.

तसेच, वाहनतळामध्ये उपयोगात येणाऱ्या रोबो ॲण्ड शटलच्या संख्येमध्ये पूर्वीच्या चारवरुन आता आठ इतकी वाढ करण्यात आली आहे. त्याच्या अनुषांगिक यंत्रणेमध्ये देखील वाढ झाली आहे. वाहनतळ उभारण्यासाठी पावसाळ्यासह एकूण ४८ महिने म्हणजे चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.

हेही वाचा… मुंबई : मालमत्ता करवाढ न करण्यावर स्वाक्षरी, राज्यपालांच्या सहीनंतर आता केवळ अध्यादेशाची प्रतीक्षा

देखभालीचे २० वर्षांचे कंत्राट

वाहनतळाची वार्षिक देखभाल आणि पार्किंगच्या यंत्रणेची सुविधा देणे या कामासाठी कंत्राटदाराला तब्बल २० वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. तर वाहनतळाचे प्रचालन, साफसफाई याकरीता पाच वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. या वाहनतळांमध्ये शटल व रोबो पार्किंगची सुविधा असेल.