मुंबई : येत्या सण-उत्सवांच्या कालावधीत मिठाईतून विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात पालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सण-उत्सवांच्या कालावधीत मुंबईतील मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. या काळात खाद्यपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे. तसेच आगामी काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.

हेही वाचा : Hotel Bademiya: मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया हॉटेल’ला टाळं; किचनमध्ये आढळले झुरळ अन् उंदीर

या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषबाधा होऊ नये म्हणून महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

हेही वाचा : मुंबई: सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई विमानतळावरून दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिठाईचा रंग बदलल्यास …

मिठाईचा रंग बदलत असल्यास / उग्र वास येत असल्यास अथवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.