मुंबई : नालासोपारा पूर्व येथे टेम्पोमधून बकरी व मेंढ्यांची वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. यावेळी गाडीच्या टपावरही बकरी व मेंढ्यांना ठेवण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

नालासोपारा पूर्व येथील तुळंज रस्त्यावर बुधवारी एका टेम्पोमधून बकरी आणि मेंढ्यांची अवैधपणे वाहतूक करीत असल्याचे रघुवीर मानवता चॅरिटेबल ट्रस्टच्या जुई कुडतरकर यांच्या निदर्शनास आले. कुडतरकर यांनी ती गाडी थांबवली. यावेळी टेम्पोत बकऱ्यांसाठी चारा-पाण्याचीही व्यवस्था केली नसल्याचे उघडकीस आले. याचबरोबर प्राण्यांच्या कानाला कोणत्याही प्रकराचे टॅंगिगही केले नव्हते, असे जुई यांनी सांगितले. या प्राण्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली नव्हती.

संबंधित चालकाविरुद्ध कुडतरकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस चौकशीत चालकाने आपले नाव दीपक राम सिंग (४०) असल्याचे सांगितले. गाडी मालकाच्या सांगण्यावरून अहमदाबाद, गुजरातमधून तलासरी मार्गे वसई ये बकऱ्या-मेंढ्या घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.

वैद्यकीय चाचणी व पंचनामा

पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी निर्मल गाव यांना संपर्क साधून तेथील रुग्णालयात बकऱ्यांना वैद्यकीय चाचणी व पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पशुआश्रमाकडे सुपूर्द

बकऱ्यांची वैद्यकीय चाचणी तसेच पंचनामा केल्यानंतर ६१ बकऱ्या व २१ मेंढ्या जीवदया चॅरिटेबल ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आल्या.