मुंबई : महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्गावरील १४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ दरम्यान सुमारे १९ तासांसाठी दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :राज्यभरातील आरटीओचे कामकाज ठप्प, कर्मचारी संघटनेकडून संप

या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

१) जी दक्षिण – करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ (पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील) एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ (दुपारी २.३० ते ३ दरम्यान पाणीपुरवठा बंद) संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग (दुपारी ४ ते सायंकाळी ७ दरम्यान ३३ टक्के पाणीपुरवठा बंद)

हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवर साडेचार तासांचा ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२) जी उत्तर – सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (दुपारी ४ ते सायंकाळी ७ दरम्यान ३३ टक्के पाणीपुरवठा बंद)