नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासुन पावसाची संततधार सुरु आहे. आज रविवारीही शहरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.सततच्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक संथगतीने सुरु असून आज शहरात नेरुळ व बेलापूर विभागात जास्त पाऊस असून सतत पावसाची रिपरिप सुरु आहे . जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसात सर्वाधिक पाऊस नवी मुंबई शहरापेक्षा मोरबे धरण असलेल्या भागात आहे. त्यामुळे नवी मुंबईचा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : चक्क संरक्षक भिंत तोडून फेरीवाल्यांनी मांडले बस्तान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या पावसाळ्यात कोठे झाला जास्त पाऊस….

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात -२८६७ मिली.मी.
मोरबे धरण क्षेत्रात झालेला पाऊस – ३२२४ मिली.मी.