मुंबई : विद्यावेतन वाढवण्याची निवासी डॉक्टरांची मागणी अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केली असून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतनात साधारण १० हजार रुपयांनी वाढणार आहे. त्यांचे विद्यावेतन आता ८५ हजार रुपये इतके होणार आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जवळपास ३ हजार वरिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यासाठी निवासी दोक्तरांची संघटना, मार्डकडून दोन वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. त्यासाठी मार्डने आंदोलनही केले होते.

निवासी डॉक्टरांची ही मागणी अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे अन्य राज्यातील निवासी डॉक्टरांच्या तुलनेत फारच कमी होते. त्यामुळे विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील निवासी डॉक्टरांना ७६ हजार रुपये विद्यावेतन मिळत होते. त्यात वाढ होऊन ते आता ८५ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मार्डचे अध्यक्ष अभिजित हेलगे यांनी दिली.

कनिष्ठ डॉक्टरांसाठी करणार मागणी

वरिष्ठ निवासी डॉक्टरांनंतर आता कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जवळपास १० हजार कनिष्ठ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. अभिजित हेलगे यांनी सांगितले.

अन्य राज्यात मिळणारे विद्यावेतन

केंद्र सरकारची रुग्णालये – जवळपास १ लाख २० हजार

मध्यप्रदेश – ८० हजार

गुजरात – ९० हजार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहार – ८६ हजार