मुंबई : भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्या अंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम सुरू केली आहे.या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष करून २६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामध्ये दहशतवादी समुद्र मार्गानेच आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास त्वरित पोलीस किंवा जवळच्या सुरक्षा यंत्रणेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.