मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विविध पक्षीय आमदारांमध्ये राजीनामा देण्याची मालिका सुरु झाली आहे. सर्वप्रथम शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना पाठवून दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या दोघांनी राजीनामा दिलेला असताना आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा हरीभाऊ बागडे यांना पाठवून दिला आहे. राज्यामध्ये मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे. सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे आमदारकीचा राजीनामा देत आहे असे भरणे यांनी म्हटले आहे. दत्तात्रय भरणे हे २०१४ मध्ये जायंट किलर ठरले होते. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आहेर यांनी मराठा आंदोलकांकडे राजीनामा सोपवला असून समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा, असे त्यांनी म्हटले आहे. ते नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार आहेत तसेच सिडको विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नाशिकमधील पहिल्या महिला आमदार सीमा हिरे यांनीही आपला राजीनामा आंदोलकांकडे सोपवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indapur ncp mla dattatray bharne resign
First published on: 26-07-2018 at 20:53 IST