करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांतील सज्जतेचा आढावा घेतला असून आता केईएम रुग्णालयामध्ये करोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, तसेच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केईएम रुग्णालयामध्ये आठवडाभरात करोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि विविध विभागांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खोकला, थंडी आणि ताप (सीसीएफ) यासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नाेंदणी, त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविणे, तसेच करोना चाचणीच्या अहवालानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या बाह्यरुग्ण विभागामध्ये करोना रुग्णांसह ‘एच३ एन२’ आणि सर्वसाधारण ताप, थंडी व खोकल्याचा त्रास होत असलेल्या रुग्णांवरही उपचार करण्यात येणार आहेत. करोना बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या आठवड्यामध्ये हा विभाग सुरू करण्यात येईल. करोना बाह्यरुग्ण विभागामध्ये सापडणाऱ्या करोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याबरोबरच त्यांची अवस्था लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा किंवा घरातच विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. विजयकुमार सिंग यांनी दिली.

हेही वाचा >>>Video: “‘सिंहासन’ चित्रपट वेदना देणारा”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, म्हणाल्या, “४४ वर्षांनंतरही…”

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही विलगीकरणात ठेवणार

रुग्णालयामधील कर्मचारी सातत्याने करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. करोनाची लागण होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात दिवस सक्तीने विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>मुंबईः कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक विभागामध्ये होणार चाचणी

करोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये रुग्णालयांतील कोणत्याही विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांना करोना चाचणी करण्यासाठी वैद्यक शास्त्र विभागात पाठविण्यात येत होते. त्यामुळे करोना रुग्ण हा संपूर्ण रुग्णालयामध्ये फिरत होता. मात्र यावेळी रुग्ण कमीत कमी रुग्णालयात फिरावा यासाठी प्रत्येक विभागामध्ये करोना रुग्णांची नोंद करण्याबरोबरच त्यांची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.