मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज करता येणर असून, प्राथमिक गुणवत्तायादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच पहिली गुणवत्ताेयादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये १ हजार ७ आयटीआय संस्था असून, त्यामध्ये शासकीय ४१९, तर खासगी ५८८ संस्था आहेत. आयटीआयच्या विविध अभ्यासाक्रमांसाठी १५ मेपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरले आहेत. नोंदणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. त्याचप्रमाणे ६८ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासाक्रमांचे पसंतीक्रम भरले आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सुरूवातील फक्त नाेंदणी वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र आता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाची प्राथमिक गुणवत्तायादी ३० जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्राथमिक गुणवत्तायादीबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. हरकती नोंदवल्यानंतर संचालनालयाकडून अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे. यांनतर ९ जुलै रोजी पहिली गुणवत्तायादी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेऱ्या आणि त्यानंतर संस्थास्तरावर समुपदेशन प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहेत.

असे असेल वेळापत्रक

ऑनलाईन अर्जासाठी मुदत – २६ जून, सायंकाळी ५ पर्यंत
प्रवेश अर्ज निश्चित करणे – २७ जून, सायंकाळी ५ पर्यंत

पहिल्या फेरीसाठी प्राधान्य सादर करणे – २७ जून, सायंकाळी ५ पर्यंत
प्राथमिक गुणवत्तायादी – ३० जून, सकाळी ११ वाजता

गुणवत्ता यादीवरील हरकती नोंदविणे – १ जुलै, सायंकाळी ५ पर्यंत
अंतिम सर्वसाधारण गुणवत्तायादी – ३ जुलै, सायंकाळी ५ वाजता

पहिली यादी – ९ जुलै, सायंकाळी ५ वाजता
प्रत्यक्षात संस्थांमध्ये प्रवेश – १० ते १५ जुलै, सायंकाळी ५ पर्यंत

दुसरी प्रवेश फेरी – २३ ते २८ जुलैदरम्यान
तिसरी प्रवेश फेरी – २८ जुलैपासून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथी प्रवेश फेरी – ४ ते ८ ऑगस्टदरम्यान
संस्था स्तरावर समुपदेश फेरी – २१ ऑगस्ट रोजी