एका हिंदी दैनिकाच्या २३ वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग करून तिला शिवीगाळ करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाला विनोबा भावे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी ही पत्रकार कुर्ला येथील मॉलमध्ये मैत्रिणीसह गेली होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिने आरोपी रिक्षाचालक रमेशकुमार जैस्वाल (४०) याची रिक्षा थांबवली होती. परंतु रिक्षाचालकाने भाडे नाकारताना अश्लील शेरेबाजी केली. तिने याबाबत जाब विचारल्यावर तिच्याशी असभ्य वर्तन करत शिवीगाळ केली. या पत्रकाराने त्याच्या रिक्षाचा क्रमांक लिहून घेतला; परंतु त्यात दोन क्रमांकात गल्लत होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रविवारी दुपारी कमानी येथील सीएनजी पंपावर जैस्वाल रिक्षात गॅस भरण्यासाठी आला असता त्याला सापळा लावून अटक केली. त्याच्यावर विनयभंग, धमकी देणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मला अश्लिल शेरेबाजी केल्यानंतर मी त्याची कॉलर पकडली तेव्हा त्याने मला सर्वांसमोर अत्यंत घाणेरडय़ा शिव्या दिल्या. पोलीस माझे काही करू शकत नाही जिकडे तक्रार करायची आहे, तिथे तक्रार कर, असेही उर्मटपणे सांगितल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2015 रोजी प्रकाशित
पत्रकाराचा विनयभंग करणारा अटकेत
एका हिंदी दैनिकाच्या २३ वर्षीय महिला पत्रकाराचा विनयभंग करून तिला शिवीगाळ करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकाला विनोबा भावे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी ही पत्रकार कुर्ला येथील मॉलमध्ये मैत्रिणीसह गेली होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तिने आरोपी रिक्षाचालक रमेशकुमार जैस्वाल (४०) याची …
First published on: 20-07-2015 at 06:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist molestation in mumbai