लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण विरंगुळा म्हणून मोबाइलवर ऑनलाईन गेम खेळण्यात दंग असतात. मात्र ऑनलाईन पत्ते आणि लूडोचा मोठ्या प्रमाणावर जुगारासाठी वापर होऊ लागला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या धारावी येथील ३३ वर्षीय तरूण लूडोमध्ये ६० लाख रुपये हरला. ती रक्कम वसूल करण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवून त्याला डांबून ठेवण्यात आले आणि त्याच्याकडून ६० लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम लूटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी अपहरण करणे, डांबून ठेवणे, जबरी चोरी, धमकावणे आदी विविध कलमांतर्गत धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र पुढील तपासासाठी हा गुन्हा वाकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

हेही वाचा >>>मुंबई: तोतया पोलिसांकडून दोन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; वरळी व वांद्रे येथे फसवणुकीच्या दोन घटना

धारावी येथील रहिवासी असलेला क्लाडीएस ज्यूड मुदलियार (३३) मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे. मुशारफ खान या परिचीत व्यक्तीने मुदलियारकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते. ते परत करण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी मुदलियार याला सांताक्रुझ पूर्व परिसरातील शास्त्री नगरमधील एका इमारतीच्या पहल्या मजल्यावर बोलावले. तेथे वेलू मुरूगन व त्याच्या साथीदाराने मुदलियारला दारू पाजली. त्यानंतर त्यांनी लूडो खेळण्यास सुरवात केली. लूडोमध्ये मुदलियार ६० लाख रुपये हरला. पण मुदलियारकडे रोख रक्कम नसल्यामुळे मुरूगन आणि त्याच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या अंगावरील दागिने काढून घेतले. दागिन्यांची किंमत ६० लाख रुपयांहून कमी असल्यामुळे आरोपींनी मुदलियारला जुगाराच्या अड्ड्यावर डांबून ठेवले. त्यानतंर त्याला मारहाण करून घरून रोख रक्कम व दागिने आणण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

हेही वाचा >>>राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ ओटीटीवर प्रदर्शित होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुदलियार याच्याकडून सोन्याचे चार नेकलेस, चार बांगड्या, आठ सोनसाखळ्या, सोन्याचे एक कडे, सात अंगठ्या, दोन ब्रेसलेट आदी एकूण ९१६ ग्रॅम वजनाचे (३६ लाख रुपये किमतीचे) दागिने व रोख २४ लाख रुपये आरोपींनी घेतले. याप्रकरणी वेलु मुरूगन व त्याचे साथीदार पप्पू, फिरोज, इरफान, नरेश, मुशारफ खान, रफीत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वाकोला पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे धारावी पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा वाकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.