राज्य सरकारावर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया सोडत नाहीयेत. गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी जाऊन भेटी देत, व्हिडिओ बनवत तर कधी पत्रकार परिषदा घेत राज्य सरकार मधील विविध मंत्री आणि नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप सोमैया करत आले आहेत. विशेषतः ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स अशा खात्यांनी केलेल्या कारवाईंमुळे, छापेमारीमुळे सोमैया यांच्या आरोपांना अधिक धार आलेली बघायला मिळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2021 रोजी प्रकाशित
राज्य सरकारवर टीका करण्याचा किरीट सोमैयांचा अनोखा मार्ग….
आज संध्याकाळी राज्य सरकारच्या घोटाळ्यांच्या राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करणार किरीट सोमैया
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 15-10-2021 at 10:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya will burn ravan statue of scams asj82