आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “उद्या (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. तेव्हा मी तर असेलच, पण शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील. पक्ष म्हणून आम्ही येऊ. केंद्रीय तपास यंत्रणांची शिवसेना, ठाकरे परिवारावर जी काही दादागिरी सुरू आहे, खोट्या आरोपांचा चिखल उडवला जातोय त्या सर्वांना उत्तरं मिळतील,” असं संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

सोमय्या म्हणाले, “संजय राऊत आणि शिवसेनेच्या पत्रकार परिषदेचं स्वागत आहे. चोख उत्तर देण्याची संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत नाही. त्यांचे आणि प्रवीण राऊत यांचे संबंध आहेत. प्रवीण राऊत जेलमध्ये आहेत. प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकरचे संबंध काय?, सुजीत पाटकरच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर शिवसेना नेत्यांनी कारवाई का केली नाही, त्याऐवजी किरीट सोमय्यावर हल्ला का केला,” असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

संजय राऊतांमध्ये कोणत्याच प्रश्नाची उत्तरं देण्याची हिंमत नसून ते खोटारड्यासारखी नाटकं करतात. विषयावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका सोमय्यांनी केली. तसेच राऊत साहेब तुरुंगात अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, असा इशारा सोमय्यांनी राऊतांना दिला.

अनिल परबांवर टीका –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना सोमय्यांनी अनिल परब गुन्हेगार असल्याचंही म्हटलं. अनिल परबांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज आपण रत्नागिरीला जाणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. यासंदर्भात तिथल्या जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे. केंद्र सरकारने आदेश दिलेत, परंतु त्यांच्या रिसॉर्टवर तोडक कारवाई कधी करणार? असा सवाल सोमय्यांनी केला आहे.