Lata Mangeshkar Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. दुपारी चार वाजता ते मुंबई विमानतळावर दाखल होतील आणि ५ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी पोहचतील. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता लतादीदींवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वच स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Lata Mangeshkar Passes Away Live : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

“मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कुणीही भरुन काढू शकत नाही. येणारी पिढी त्यांना भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवे, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.” असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘मला शब्दांमध्ये व्यक्त होता येणार नाही’, पंतप्रधान मोदींनी वाहिली लतादीदींना श्रद्धांजली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.