मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्या वादानंतर आता महापौरांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर पोलिसांत तक्रार दाखल करणार असून कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत.

गुरुवारी संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर हे पत्र पोहचले होते. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. टीव्ही ९च्या वृतानुसार  माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

यामध्ये गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. कारण दुसऱ्यांचा अशा प्रकारची धमकी किशोरी पेडणेकर यांना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात फोनवरुन किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा निनावी पत्र थेट महापौर बंगल्यात आले आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. पोलिसांनी शेलार यांचा जबाब नोंदवून जामीन मंजूर केला. या दमदाटीला न घाबरता राज्य सरकार विरोधात कडवा संघर्ष करण्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे