मुंबई : राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने विदर्भातून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाचे रेषा निर्माण झाली आहे. ही रेषा विदर्भातून जाते. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होऊन, पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाचा इशारा असा

शुक्रवार : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा यवतमाळ. (पिवळा इशारा).

शनिवार : गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा यवतमाळ. अमरावती अकोला वाशिम, नाशिक. (पिवळा इशारा). चंद्रपूर (नारंगी इशारा).

रविवार : उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भ. (पिवळा इशारा) चंद्रपूर, गोंदिया.(नारंगी इशारा).

सोमवार : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, (पिवळा इशारा)