भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून ईशान्य मुंबईतून नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोटक सध्या महापालिकेतील गटनेतेपदीची जबाबदारी सांभाळत आहेत. किरीट सोमय्यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याचा फटका त्यांना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी-अमराठी मतांचा मेळ घालण्यासाठी मनोज कोटक यांचं नाव पुढे करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कोटक मुलुंडमधून निवडून आले आहेत. सध्या महापालिकेत भाजपचे गटनेतेपदी आहेत. मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडूप परिसरात चांगला जनसंपर्क आहे. मनोज कोटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन वेळा कोटक यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता.

(आणखी वाचा : किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी)

http://myneta.info या वेबसाईटने २०१४ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मनोज कोटक यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोटक यांनी भांडूप वेस्ट मधून नशीब अजमावले होते. मात्र, शिवसेनेच्या अशोक पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये कोटक यांची एकूण संपत्ती 2,06,41,572 रूपये होती. कोटक यांच्यावर कोणत्याही बँकेचे लोन नाही.

मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्याने आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2019 who is manoj kotak
First published on: 03-04-2019 at 17:18 IST