‘अभ्युदय बँके’च्या साहाय्याने ‘लोकसत्ता’चा उपक्रम
आधुनिक युगात समाजातील असंख्य स्त्रिया जिद्द, परिश्रम आणि अविरत कष्टाच्या जोरावर समाजात विविध पातळ्यांवर संघर्ष करताना आपण पाहतो. त्याग, नम्रता, सुजाणपणा अशा गुणांच्या जोरावर स्त्रीने उच्च पदांवर विराजमान होताना समाजाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. अशाच धडाडीच्या स्त्रीशक्तीचा नवदुर्गाचा शोध ‘लोकसत्ता’ घेत आहे. येत्या नवरात्रोत्सवानिमित्त यंदाही ‘शोध नवदुर्गेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘अभ्युदय बॅंक’ हे या कार्यक्रमाचे प्रायोजक तर ‘केसरी’ सहप्रायोजक आहेत.
या उपक्रमासाठी नऊ ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार आहे. विधायक कार्य करत असताना नवी ओळख निर्माण करणाऱ्या अशा दुर्गाची माहिती आम्हाला हवी आहे. समाजातील ही ‘दुर्गा’ असेल तुमच्या आमच्यातलीच, परंतु धाडसी, नेहमीच्या चौकटीतील गोष्टींना टाळून नवे कार्य घडवणारी, समाजातल्या वंचितांना मायेची सावली देणारी, त्यासाठी कदाचित समाजाच्या, कुटुंबीयांच्याही विरोधात जाऊन विधायक उपक्रम राबविणारी. अशा दुर्गाची माहिती आमच्या कार्यालयीन पत्त्यावर ३० सप्टेंबपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
आमचा पत्ता
लोकसत्ता शोध नवदुर्गेचा,
ईएल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा loksattanavdurga@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta initiative searching powerful women
First published on: 29-09-2015 at 00:30 IST