‘लोकसत्ता’मध्ये लेखमालिकांच्या रूपात प्रसिद्ध झालेली चार पुस्तके अ‍ॅमेझॉनवर ई-बुक स्वरूपात उपलब्ध झाली आहेत.  त्यामुळे आता ती किंडलवरही वाचता येणार आहेत.  त्यात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची ‘अग्रलेख’ व ‘अन्यथा’ ही पुस्तके, अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांचे ‘वित्तार्थ’ हे पुस्तक आणि तुलसी आंबिले व समर्थ साधक यांचे ‘तुका राम दास’ हा ग्रंथ यांचा समावेश आहे. ही चारही पुस्तके डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहेत.

‘अग्रलेख’मध्ये कुबेर यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या निवडक अग्रलेखांचे संकलन करण्यात आले आहे. ‘अन्यथा’मध्ये कुबेर यांनी बातमीच्या पलीकडील अशा विषयांची दखल घेतली आहे. ‘वित्तार्थ’मध्ये डॉ. रेगे नित्सुरे यांनी देशाच्या आर्थिक समस्या, त्यांची सामाजिक-राजकीय कारणे, देशापुढील आर्थिक आव्हाने आदी विषयांचे विश्लेषण केले आहे, तर ‘तुका राम दास’मध्ये आंबिले व साधक यांनी संत तुकाराम व रामदास यांच्या कार्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे.