‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेंतर्गत सहभागी ग्राहकांचा आनंद द्विगुणित

मुंबई : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनेंतर्गत दादर येथील लागू बंधू, प्रभादेवी येथील चिंतामणीज ज्वेलर्स आणि वरळीतील श्री नेमिनाथ ज्वेलर्स येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना अभिनेत्री निशिगंधा वाड यांना भेटण्याची संधी मिळाली. दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या सोने खरेदीच्या क्षणांचा गोडवा निशिगंधा वाड यांच्या भेटीने अधिकच वाढला.

खास धनत्रयोदशीच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी निशिगंधा वाड यांनी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या तिन्ही ब्रँण्ड्सना भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. मराठी – हिंदूी चित्रपट आणि मालिकांमधून सातत्याने वेगवेगळय़ा भूमिकांमधून कार्यरत असलेल्या निशिगंधा वाड सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत राजमाता जिजाऊंची भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रुणवाल ग्रुप सहप्रायोजित ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला ऐन दिवाळीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोने खरेदीवर बक्षिसे जिंकून देणारा हा आनंदोत्सव ५ नोव्हेंबपर्यंतच सुरू राहणार आहे. 

आज ऐश्वर्या नारकर भेटीला

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनें’तर्गत कांदिवली पश्चिमेकडील एम. के. घारे ज्वेलर्सला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर भेट देणार आहेत. एरव्ही प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर ‘स्वामिनी’ मालिकेत करारी गोपिकाबाईंच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांनी कौतुकाची दाद दिली. मराठी – हिंदूी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना भेटण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉिशग मशीन अशी आकर्षक बक्षिसे जिंका. या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रुणवाल ग्रुप, प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स. गोल्ड पार्टनर – श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कंपनी. तर सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज ज्वेलर्स हे आहेत. तसेच आय केअर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे असून उषा एजन्सी गिफ्ट पार्टनर आहेत.

कधी? : ३ नोव्हेंबर २०२१,

दुपारी १ वाजता

कुठे ? :एम. के. घारे ज्वेलर्स – कांदिवली (पश्चिम)