प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना सोमवारी ‘ई-गव्हर्नन्स’ची अनोखी भेट दिली. सरकारी कारभारातील लोकसहभाग वाढावा आणि जनतेच्या समस्या जाणून घेता याव्यात, या उद्देशाने राज्य सरकारतर्फे ‘आपले सरकार’ हे मोबाईल अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपले सरकार’ या अॅप्लिकेशनचे उदघाटन करण्यात आले. या अॅप्लिकेशन आणि पोर्टलच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. तसेच अधिक कार्यक्षम सरकारी कारभारासाठी अभिप्राय देखील राज्यातील जनतेला सरकारला कळवता येणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान संचालनालयाकडून (डीआयटी) तयार करण्यात आलेल्या या अॅपसाठी राष्ट्रीय माहिती संस्था, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ऑनलाईन या संकेतस्थळाची मदत घेण्यात आली आहे.
‘आपले सरकार’ संकेतस्थळ- aaplesarkar.maharashtra.gov.in
संग्रहित लेख, दिनांक 27th Jan 2015 रोजी प्रकाशित
जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यात ‘आपले सरकार’!
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना 'ई-गव्हर्नन्स'ची अनोखी भेट दिली आहे.
First published on: 27-01-2015 at 02:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha govt launch aplesarkar portal and mobile app