महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१२-१३ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या गटांमध्ये ३१ लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून यात प्रज्ञा दया पवार, नीरजा, बाबा भांड, मधु मंगेश कर्णिक, संध्या नरे-पवार आणि अन्य लेखकांचा समावेश आहे.
उत्कृष्ट वाङ्यम निर्मितीसाठी जाहीर झालेले पुरस्कार साहित्य प्रकार, पुरस्काराचे नाव, पुरस्कार प्राप्त लेखक, कंसात पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम या प्रमाणे
प्रौढ वाङमय (काव्य) -कवी केशवसुत पुरस्कार: प्रज्ञा दया पवार (दृश्यांचा ढोबळ समुद्र), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : अभय दाणी (एरवी हा जाळ), ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : शिफारस नाही; प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका)- विजय तेंडूलकर पुरस्कार : शिफारस नाही; प्रौढ वाङमय (कांदबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : आनंद विनायक जातेगांवकर (अस्वस्थ वर्तमान),१ लाख रुपये ; प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : अवधूत डोंगरे (स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट) , ५० हजार रुपये ; प्रौढ वाङमय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : नीरजा (पावसात सूर्य शोधणारी माणसं), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार : गुणवंत मधूकर पाटील (भरळ), ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (ललितगद्य) (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार : हेमंत देसाई (बाबू मोशाय)- (सुहाना सफर), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई िशदे पुरस्कार : ऋषिकेश पाळंदे (दोन चाकं आणि मी), ५० हजार रुपये;
प्रौढ वाङमय (विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : अनिल पंढरीनाथ सोनार (विश्वसुंदरी सुलभ हप्त्यात), १ लाख रुपये; प्रौढ वाङमय (चरित्र)- न.चिं.केळकर पुरस्कार: बाबा भांड (लोकपाळ राजा सयाजीराव), १ लाख रुपये; प्रौढ वाङमय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : मधु मंगेश कर्णिक (करुळचा मुलगा), १ लाख रुपये; प्रौढ वाङमय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार: डॉ.ऋषीकेश कांबळे (दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री), १ लाख रुपये; प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : हेमंत खडके (अर्वाचीन कवींचा काव्यविचार), ५० हजार रुपये; प्रौढ वाङमय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : संध्या नरे- पवार (तिची भाकरी कोणी चोरली ?), १ लाख रुपये;
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१२-१३ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
First published on: 21-02-2014 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government declared excellent literary awards