मुंबई : विशेष न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील मुख्य आरोपींपैकी एक भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरूवारी खटल्याच्या सुनावणीला उपस्थिती लावली. त्यावेळी, यापुढेही खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने ठाकूर यांना दिले.

हेही वाचा >>> मालाड दुर्घटनेप्रकरणी पर्यवेक्षकाला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीय कारणास्तव प्रज्ञासिह यांना अनुपस्थित राहण्याची सूट देण्यात आली होती. तसेच, २५ एप्रिल रोजी उपस्थित न झाल्यास योग्य ते आदेश दिले जातील, असा इशाराही विशेष न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. त्यानुसार, प्रज्ञासिंह गुरुवारी न्यायालयात उपस्थित झाल्या. आपल्याला अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले आहे. तसेच, प्रकृती अस्वास्थामुळे आपल्याला उभेही राहता येत नसल्याचा दावा प्रज्ञासिंह यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर सुनावणीदरम्यान केला. त्याची दखल न्यायालयाने घेतली. मात्र, ३० एप्रिलपर्यंत खटल्यातील सर्व आरोपींचे जबाब नोंदवण्यात येतील, असे स्पष्ट करून साध्वी यांना शुक्रवारी सुनावणीला उपस्थिती राहण्याचे आदेश दिले.