मुंबई : समुद्रातून भारतात आलेले दोन पाकिस्तानी दहशतवादी हॉटेल ताजवर हल्ला करणार असल्याचा मजकूर समाज माध्यमांवर पाहिल्याची खोटी माहिती देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सांताक्रुझ येथून पकडले. जगदंबा प्रसाद सिंह असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो व्यवसायाने स्वयंपाकी आहे. सिंह याने पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून हॉटेल ताजवर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला होणार असल्याची खोटी माहिती दिली. सिंह हा गोळीबार रोड परिसरात सांताक्रूझ (पश्चिम) येथे राहतो. त्याने गुरुवारी संध्याकाळी नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून उर्दूमध्ये फेसबुक पोस्ट पाहिली असून त्यात दोन पाकिस्तानी सागरी मार्गाने मुंबईत येतील आणि ताज हॉटेलवर हल्ला करतील, असे लिहिले असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Video: “इंडीची भेंडी आघाडी…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, बैठकीत ममता बॅनर्जींना खुर्चीच मिळाली नाही!

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

सुरक्षा यंत्रणांनी हॉटेल ताजभोवती सुरक्षा वाढवून त्याचा आढावा घेतला. पण तिथे कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नाही. अखेर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने दूरध्वनी उचलणे बंद केले. अखेर त्याचा शोध घेण्यात आला. गुन्हे शाखेच्या कक्ष 9 च्या पोलिसांनी प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी समांतर तपासाला सुरुवात केली आहे. सिंह याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५(१)(बी) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस अधिक तपास करत आहेत.