रबाले येथील भिमनगरमधील कन्नडवाडीमधील एका १३ वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत बलात्कार करणाऱ्याला रबाले एमआयडीसी पोलसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. पिडीत मुलीला आईला जीवे मारण्याची धमकी देत, त्याने अत्याचार केला होता.
राजेश गंगय्या नाईक (४५) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी पिडीत मुलीच्या घराशेजारीच राहणारा असून रविवारी रात्री दारूच्या नशेत असलेला राजेश त्याने घरात पिडीत मुलीची आई नसल्याचा फायदा घेत घरात घुसला. यावेळी पिडीत मुलीच्या लहान भावांना त्यांनी घराबाहेर काढले.
यानंतर पिडीत मुलीला आई जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर त्याने पळ काढला होता. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून राजेश याच्या विरोघीत गुन्हा दाखल करत मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2014 रोजी प्रकाशित
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत
रबाले येथील भिमनगरमधील कन्नडवाडीमधील एका १३ वर्षीय मुलीवर दारूच्या नशेत बलात्कार करणाऱ्याला रबाले एमआयडीसी पोलसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे.
First published on: 19-06-2014 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for molesting minor girl