राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां माणिकताई टिळक यांचे बुधवारी चेंबूर येथे निवासस्थांनी निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार दिवंगत वि. ना. देवधर आणि सहकारी भारती संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी वसंतराव देवधर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी दहा वर्षे समितीच्या विस्तारक म्हणून मराठवाडा आणि खानदेश येथे संघटनात्मक काम केले. वयाच्या ६३ व्या वर्षांनतर त्या आणि त्यांचे पती माधवराव टिळक यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणूनही काम केले. या दोघांनी छत्तीसगड राज्यातील भानपुरी येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे काम पाहिले होते.