मुंबई : मिरा रोड येथे मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना आयुक्त मधुकर पांडे यांची तेथून उचलबांगडी करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक निकेत कौशिक मिरा-भाईंदर-वसई-विरारचे नवीन आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.मिरा भाईंदर शहरात मराठी बोलण्यावरून सुरु झालेल्या वादाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढून आंदोलन केले.

मनसेने आपली भूमिका ठाम ठेवून त्याबाबत आंदोलन केले होते. मराठीच्या समर्थनार्थ मिरा रोडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. मिरारोडमध्ये गेल्यावर्षी धार्मिक तेढ निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली होती. त्यावेळी मधुकर पांडे यांच्या कार्यपद्धतीबाबत वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मराठीचा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी तात्काळ त्यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) येथे बदली करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत निकेत कौशिक?

मिरा-भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी यापूर्वी मुंबईत सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) असे महत्त्वाचे पदभार सांभाळले आहेत. याशिवाय दहशतवाद विरोधी पथकातही त्यांनी काम केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांची दोनवेळा नियुक्ती झाली आहे. त्याशिवाय मुंबई लोहमार्ग आयुक्तपदाची जबाबदारीही कौशिक यांनी सांभाळली आहे. इंग्रजी, मराठी, हिंदीसह आठ विविध भाषा ते बोलतात. मूळचे हरियाणा येथील रहिवासी असलेले कौशिक यांना राष्ट्रपदी पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे.