मुंबई : दादर येथील न. चि. केळकर मार्गावरील स्टार मॉलमध्ये शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास भीषण आग लागली. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य हाती घेतले.
दादरमधील शिवाजी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टार मॉलच्या पहिल्या मजल्यावर मॅकडोनल्ड्स आहे. दररोज अनेकजण विशेषतः महाविद्यालयीन मुले खाण्या-पिण्याची मॉलमध्ये येतात. मात्र, बुधवारी दुपारी मॉलमधील मॅकडोनल्ड्समधील स्वयंपाकघरात अचानक लागली. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी तात्काळ बाहेर पळ काढला.
दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतले. आगीची तीव्रता सातत्याने वाढत असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाने ३.४८ च्या सुमारास आगीला क्रमांक एकची वर्दी दिली. तसेच, धुरामुळे अग्निशामकांना आग विझवण्यात अडचणी येत असून अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
