मुंबई: मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ – उतार सुरुच आहे, पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे पहाटे मध्यम थंडी जाणवू शकते.

अद्याप मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभव आलेली नाही. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडी पडेल अशी आशा होती. मात्र जानेवारी महिन्यातही जैसे थे परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानाचा पारा देखील अजून चढा आहे त्यामुळे वातावरणात उष्मा जाणवत आहे. थंडी पडण्यासाठी किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात देखील घसरण होणे गरजेचे आहे.

हेही वाचा… घरफोडी करणाऱ्या चोराचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीमुळे केरळ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी

जानेवारी ते मार्च या काळात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मात्र ,कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असले तरी पावसाची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.