मुंबई : गोवरच्या संसर्गाला साधारणपणे हिवाळ्यामध्ये सुरुवात होत असून सध्याचा काळ गोवर वाढीचा आहे. दरवर्षी मार्चपर्यंत गोवरचे रुग्ण आढळतात. परिणामी, सध्या गोवरचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे. वाढत्या थंडीमुळे गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

करोनाकाळामध्ये लसीकरण मोहीम योग्यरित्या राबविण्यात न आल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये गोवरचा उद्रेक झाला. हा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने विशेष लसीकरण मोहीम राबविली. परिणामी, जानेवारीपर्यंत गोवरचा उद्रेक आटोक्यात आणणे शक्य झाले. असे असले तरी सध्याचा काळ हा गोवरच्या संक्रमणाचा असून दरवर्षी साधारण हिवाळा सुरू झाल्यानंतर गोवरचे रुग्ण आढळून येतात.

हेही वाचा >>> “राजन विचारे यांच्या सुरक्षेत कशाच्या आधारे कपात?” सुरक्षा कपातीबाबतचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मार्च महिन्यापर्यंत गोवरचे रुग्ण आढळतात. परिणामी, गोवर संक्रमणाचा कालावधी अद्याप सुरूच आहे. गोवरचा संसर्ग हिवाळा सुरू झाल्यावर सुरू होतो आणि मार्चपर्यंत कायम असतो. त्यामुळे पुढील दोन महिने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे गोवर राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पंतप्रधान आवास योजनेत आतापर्यंत ६८ लाख घरे पूर्ण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लसीकरण मोहिमेला ९९ टक्के प्रतिसाद

गोवरची प्रकरणे शून्य करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अधिकाधिक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. राज्य सरकारमार्फत राबवलेल्या अतिरिक्त लसीकरण मोहिमेला ९९ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील काळातही लसीकरणावर अधिक भर देण्यात येईल, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.