मुंबई : नीट – २०२५ परीक्षा ४ मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी कोणताही मेगाब्लाॅक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत, सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसकालीन ब्लाॅक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल – माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत चार तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

या कालावधीत रेल्वे मार्ग दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या उपकरणांची देखभाल, दुरूस्ती करण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ – चर्चगेट स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.