मुंबई : कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकादरम्यान पायाभूत कामासाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी मेगाब्लॉक घेतला जाईल. दुपारी १.१० ते दुपारी ३.४० असा २.३० तासांचा मेगाब्लॉक असेल. यावेळी कोकण रेल्वेवरील तीन रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल. त्यामुळे प्रवाशांचा जादा वेळ प्रवासातच जाणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : रेल्वे स्थानकांवर विद्युत रोषणाई

मंगळवारी गाडी क्रमांक १६३४५ एलटीटीवरून सुटणारी तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस कोलाड-वीर विभागादरम्यान ४० मिनिटे थांबवण्यात येईल. मंगळवारी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोडवरून सुटणारी दिवा एक्स्प्रेस रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान एक तास थांबवण्यात येईल. सोमवारी सुटणारी गाडी क्रमांक ०२१९७ कोईम्बतूर जं. जबलपूर एक्सप्रेस मंगळवारी रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.