मुंबई: मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) प्रकल्पातील प्रकल्पबाधितांचे योग्य पुनर्वसन करण्यात आलेले नाही, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे आरोप करून गिरगाव येथील रहिवाशी मंगळवारी मेट्रो ३ विरोधात रस्त्यावर उतरले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) याकडे लक्ष दिले नाही तर गिरगावातील मेट्रो ३ चे काम बंद पाडण्याचा इशारा यानिमित्ताने रहिवाशांनी दिला.

हेही वाचा >>> ‘खासदार राजन विचारे यांच्या जीवाला धोका?’ अजित पवार म्हणाले, “निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीच्या…”

हेही वाचा >>> मुंबई : पुरुषोत्तम, खंडोबा आणि धूतपापेश्वर मंदिराच्या कामाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो ३ मध्ये गिरगाव येथील अनेक जुन्या-उपकरप्राप्त इमारती बाधित होणार आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनाची आणि त्यांच्या इमारतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी एमएमआरसीवर आहे. मात्र एमएमआरसीकडून पुनर्वसनाबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गिरगावमधील रहिवाशांचा आहे. त्यामुळे संतप्त रहिवासी, आम्ही गिरगाव ग्रुप तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. यावेळी एमएमआरसीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एमएमआरसीने प्रकल्पाबाधितांचे प्रश्न न सोडवल्यास येत्या काळात गिरगावमधील मेट्रो ३ चे काम बंद करू असा इशारा यावेळी देण्यात आला.