लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाने इच्छुकांना मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मंडळाने सोमवारी ४,६५४ घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून बुधवार, ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात होत आहे.

आणखी वाचा- मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन चार तास पावसाचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण मंडळाची सोडत बराच काळ रखडली होती. अखेर इच्छुकांची प्रतीक्षा संपली असून घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार बुधवार, ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. नोंदणीस याआधीच सुरुवात झाली आहे. नोंदणी आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करून इच्छुकांना बुधवारपासून बँकेत अर्ज सादर करता येतील. ही संपूर्ण प्रकिया ऑनलाईन असणार आहे.