मुंबईत ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्यांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली. ‘म्हाडा’च्या मुंबईतील 217 घरांसाठी आज (रविवारी) सोडत काढण्यात आली. दरम्यान, राशी कांबळे या सोडतीच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. ‘म्हाडा’च्या वेबसाईटवरून या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 217 सदनिकांसाठी सुमारे 66 हजार जणांनी यावेळी अर्ज केले होते. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी चेंबुरच्या सहकार नगरमधील 170, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 47 सदनिकांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राशी कांबळे या सोडतीच्या पहिल्या मानकरी ठकल्या असून दीनानाथ नवगिरे हे सोडतीचे दुसरे मानकरी ठरले आहेत. 217 सदनिकांसाठी सकाळी 10 वाजता म्हाडाच्या मुख्यालयात सोडत जाहीर करण्यात आली. एकूण 217 जण यामध्ये भाग्यवान विजेते ठरले आहेत. सोडतीला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधू चव्हाण उपस्थित होते.

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 53,455 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 12,636 अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही गटांत अनुक्रमे सुमारे 106 कोटी आणि 37 कोटी इतकी अनामत रक्कम जमा झाली आहे. मुंबई मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांमधल्या 217 सदनिकांच्या विक्रीसाठी 6 मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 13 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करुन 24 मे 2019 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada lottery drawn today for 217 flats mumbai
First published on: 02-06-2019 at 13:46 IST